अमकोर कंपनीने बांधून दिल्या वर्गखोल्या

0

शेलपिंपळगांव । धानोरे (ता.खेड) येथील ’अमकोर’ कंपनीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस दोन वर्ग खोल्या बांधून दिल्या.
वाढत्या औद्योगिकरणामुळे जि. प. प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुलनेत वर्ग खोल्यांची संख्या अपुरी पडत असल्याने अमकोर रिजिड प्लास्टिक इंडिया प्रा. लि. या कंपनीने 7 लाख 10 हजार रुपये खर्चुन बांधलेल्या वर्ग खोल्यांचे उद्घाटन कंपनीचे जनरल मॅनेजर प्रणेश कणकणवाडी, मंदीप छाबा, व सिनिअर मॅनेजर राहुल रबडे यांच्या हस्ते करून या वर्ग खोल्यांचे लोकापर्ण केले. यावेळी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे, धानोरेच्या सरपंच सुंदरा गावडे, उपसरपंच अनिल गावडे, मरकळ केंद्र प्रमुख सुरेश कातोरे, बजरंग ठाकुर, बाळासाहेब रोकडे, बाळासाहेब गावडे, मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे, अ‍ॅड. संदीप गावडे, ज्ञानेश्वर कांबळे, दिपाली शिंदे, नयना शिंदे, संगिता शिवले, छाया पवळे आदींसह ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.