जळगाव । निवृत्त वनरक्षकाच्या घरात डल्ला मारीत चोरट्यांनी 65 हजार 500 रूपयांचा ऐजव चोरून नेल्याची घटना गुरूवारी रात्री अमन पार्क येथे उघडकीस आली होती. याप्रकरणी आज शुक्रवारी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन पार्क येथे शाकीर शेख कादर हे कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांच्या घराशेजारी त्यांचे शालक इक्बाल शेख गयासुद्दीन हे राहतात. गुरुवारी रात्री वाजता शाकीर शेख हे कुटुंबीयांसह इक्बाल शेख यांच्याकडे जेवणासाठी गेले होते. त्यांनी जाण्यापूर्वी मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावले तर मागचा दरवाज्यास कडी आतून लावली होती.
निवृत्त वनरक्षकांच्या घरात चोरी
चोरट्यांनी मागच्या दरवाजाला टॉमीने उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर मुख्य दरवाजाला आतून कडी लावून त्यांनी घरातील तीन खोल्यांमधील कपाट, कॉट उघडून सामानाची फेकफाक केली. शेख यांच्या पत्नीच्या पर्समध्ये ठेवलेली कपाटाची चावी मिळवत त्यांनी कपाट उघडले. त्यात ठेवलेली ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ग्रॅमचे सोन्याचे कानातले, हिर्याचा खडा, महागडे घड्याळ, हजार रूपये रोख एक मोबाइल, असा 65 हजार 500 रुपयांचा हजारांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी आज शुक्रवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख हे करीत आहेत.