अमरनाथमध्ये यात्रेकरुचा मृत्यू

0

श्रीनगर । चाळीस दिवस चालणार्‍या अमरनाथ यात्रेस 29 जूनपासून प्रारंभ झाला असून गेल्या सहा दिवसांत जवळपास 80,000 यात्रेकरूंनी अमरनाथची यात्रा पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशातील एका 59 वर्षीय व्यक्तीचा अमरनाथ यात्रेदरम्यान मृत्यू झाला आहे. मध्य काश्मीरमधील बाल्टाल बेस कॅम्पवर अमरनाथ यात्रा पोहचली असताना ही घटना घडली आहे. यात्रा सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत सात यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बंकी लाल असे या भाविकाचे नाव असून ते उत्तर प्रदेशातील बिसालपूरमधील मोहल्ला पटेलनगरमध्ये राहणारे आहेत. याआधीही यात्रेदरम्यान भाविकांचा मृत्यू झाल्याच्या घटना आहेत. आत्ता मृत्यूचा आकडा सात झाला आहे. याआधी सहा भाविकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. 28 जून रोजी आयटीबीपीचे सहाय्यक उपनिरिक्षकांचाही मृत्यू झाला.