अमरनाथ गुफेत मंत्रोपच्चार, घंटानादास बंदी

0

राष्ट्रीय हरित लवादाचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : हिंदूंचे पवित्र देवस्थान असलेल्या अमरनाथ गुंफेत मंत्रोच्चारावर व घंटानाद करण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. मंत्रोच्चारासोबतच मंदिरात घंटा वाजविण्यावर तसेच देवाच्या जयघोषावरही बंदी घालण्याचे निर्देश लवादाने दिले आहेत. तसेच यापुढे भाविकांना तपासणी नाक्यांच्यापुढे मोबाईल नेण्यासदेखील मनाई करण्यात आली. लवादाने दिलेल्या या सर्व आदेशांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश मंदिर प्रशासनाला देण्यात आले आहेत.

भाविकांसाठी सोयीसुविधा करण्याचेही आदेश
बुधवारी हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांनी हे निर्देश दिले आहेत. अमरनाथ मंदिराच्या गुंफेत भाविकांनी मंत्रोच्चार व जयघोष करण्यावर व मोबाईल गुंफेत नेण्यास मंदीर प्रसासानाने बंदी घालावी. भाविकांचे मोबाईल व सामान ठेवण्यासाठी मंदीर प्रशासनाने एक विशेष खोली बांधावी. या सर्व नियमांचे काटकोरपणे पालन झाले पाहिजे, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले आहेत. तसेच या सुनावणीवेळी लवादाने अमरनाथ मंदीर प्रशासनाला मंदीर परिसरातील पायाभूत सुविधा वाढविण्याचेदेखील आदेश दिले आहे. मंदिर परिसरात भाविकांसाठी फारच कमी सोयीसुविधा आहेत, त्यामुळे प्रशासनाने पायाभूत सुविधांत वाढ करावी तसेच दर्शनाला येणार्‍या भक्तांची चेकपोस्टपासून एकच रांग तयार करावी जेणेकरुन कोणत्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही, असे लवादाने सांगितले आहे.

हे आहेत आदेश
– श्लोक किंवा मंत्र म्हणायचे नाहीत
– भजनही गायाचे नाहीत
– शिवस्त्रोत्र किंवा मंत्र म्हणायचे नाहीत
– घंटाही वाजवायची नाही