जम्मू-कश्मीर । जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग येथील अमरनाथला जाणार्या बसवर आंतकवादी हल्ला होवून त्यात सहा भाविकांचा मृत्यू झाला असून इतर सहाजण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना जवळच्याच इस्पितळात उपचारार्थ दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 8.20 वाजता दोन आतंकवादी दुचाकीवर स्वार होवून अमरनाथ जाणार्या भाविकांच्या बसजवळ येवून बेछुट गोळीबार केल्याचे कळते. या हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली असून जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.