अमरनाथ यात्रा थांबवली

0

जम्मू : चाळीस दिवस चालणार्‍या अमरनाथ यात्रेस 29 जूनपासून प्रारंभ झाला असून पहिल्या सहा दिवसांत जवळपास 80,000 यात्रेकरूंनी अमरनाथची यात्रा पूर्ण केली आहे. 7 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी समाप्त होईल. तथापी दहशतवादी बुरहान वानीला ठार मारल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने काश्मीर खोर्‍यात तयार झालेली तणावाची स्थिती लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा जम्मूपासून थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर या परिस्थितीमुळे जम्मु आणि काश्मीर राज्यात काही शहरांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, यात्रा मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, जॅमर्स, बुलेटप्रुफ बंकर्स, श्वान पथके आदी यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या जथ्यालाही सीआरपीएफ जवानांच्या तुकडीचे संरक्षण देण्यात येत आहे.