नंदुरबार । पवित्र आणि संपूर्ण हिंदुस्थानचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेकरुंवरील बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा नंदुरबार जिल्हा मनसेतर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की हिंदुस्थानच्या पवित्र आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला होतो. अत्यंत भ्याड आणि निर्दयी हल्ला म्हणजे हिंदुस्थानावर आक्रमण या हल्ल्याचा नंदुरबार जिल्हा मनसेतर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे.
दहशतवाद्यांना वेळीच ठेचून काढा
अमरनाथ नव्हे तर हिंदुस्थानातील कुठल्याही मंदिरावर असा भ्याड हल्ला करणार्या दहशतवाद्यांना वेळीच ठेचून काढा. कारण यामुळे हिंदुत्व आणि त्यांच्या भावनांचा अनादर होतो. म्हणून यापुढे असा भ्याड हल्ला करणार्या प्रवृत्तीचा मनसेतर्फे वाघेश्वरी चौफुलीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहराध्यक्ष ईश्वर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल कोकणी, शहर उपाध्यक्ष सुमानसिंग राजपूत, जिल्हासचिव पवन गवळे, तालुकाध्यक्ष राकेश माळी, प्रविण जोशी, दीपक चौधरी, दिनेश मराठे, बळीराम भिल, दिलीप पाटील, उमेश ठेलारी, दीपक पाटील, राजेश गवळी, आबा भोई, दिनेश मराठे, सुदाम चौधरी आदी उपस्थित होते.