रामबन: अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था आज रविवारी ३० रोजी जम्मू बेस कॅम्पवरून कडेकोट बंदोबस्तात रवाना झाला. ४६ दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी देशभरातून आतापर्यंत जवळपास दीड लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. दरम्यान पहिल्या बॅचचे जम्मू-काश्मीरमधील स्थानिक पोलीस प्रशासनाने स्वागत केले आहे. मिठाई देऊन भाविकांचे स्वागत करण्यात आले. रामबन येथे भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासनाने तयारी केली होती.
हे देखील वाचा