श्रीनगर : रामबन जिल्ह्यातील बनिहाल लगतच्या जम्मू-श्रीनगर महामार्गावर अमरनाथ यात्रेकरूंची बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात 16 भाविकांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले होते. अपघात नेमका कशामुळे घडला, हे उशीरापर्यंत समजू शकले नव्हते. अपघातानंतर बचावकार्यासाठी भारतीय लष्कराचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी पोहोचताच त्यांनी बचावकार्याला सुरूवात केली. अपघातग्रस्त बसमधून 45 भाविक प्रवास करत होते. काही दिवसांपूर्वीच अमरनाथ यात्रेवरून परतणार्या भाविकांच्या बसवर दहतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंत पुन्हा हा दुर्देवी प्रकार घडला.
बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर
हवाई दलाने 19 जखमींना एअरलिफ्ट करुन उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये 6 लहान मुले आहेत. घटना घडली ते ठिकाण लष्करी तळापासून जवळ असल्याने लष्कराने तातडीने बचाव कार्य सुरु करण्यात आले. जखमींना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. हवाई दलानेही एक हेलिकॉप्टर बचाव कार्यासाठी तैनात केले होते. ही बस अमरनाथ यात्रेच्या भाविकांना जम्मूहून पहलगाम इथे घेऊन जात होती. जम्मू-काश्मीर परिवहन महामंडळाची ही बस (जेके 02 वाय 0594) आहे.
दरीतील दगडांमुळे मोठे नुकसान
ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यावर बस काही फूट खोल दरीत कोसळली. तिथे एक पावसाळी नाला आहे. यात्रेकरुंचा मृत्यू हा दरीत असणारे मोठ-मोठे दगड लागल्याने झाला आहे. रामबनचे एसएसपी मोहन लाल यांनी ही माहिती. रामबनचे वरिष्ठ पोलिस अधिकक्षक मोहन लाल यांनी सांगितले की, दुपारच्या सुमारस अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन बस निघाली होती. अवघड वळणांचा हा रस्ता खुपच निसरडा झाल्याने बस घसरून दरीत कोसळली. अपघातनंतर बचावकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी संपर्क साधला. तसेच राजनाथ यांनी अपघातात मरण पावलेल्या यात्रेकरूंच्या दुखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.
यात्रेकरूंच्या मृत्यूमुळे दु:ख
अपघातात 16 अमरनाथ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याने खुप दु:ख होत आहे. मरण पावलेल्या भाविकांच्या कुटूंबियांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. जखमी भाविकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, हीच इश्वराकडे पार्थना
नरेंद्र मोदी, पंतप्रधात