धुळे । अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निवेदन म्हटले आहे की, सैन्य दलाचे जवान अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून सुरक्षेचा प्रयत्न करीत असताना देखील असा हल्ला होऊ शकतो याचा अर्थ अतिरेकी कारवाया करणार्यांचे नेटवर्क अजूनही सक्षम आहे. काश्मीर घाटी अतिरेक्यांच्या तावडीतून मुक्त करायची असेल तर काही दिवस हा प्रदेश मिलीटरीच्या ताब्यात देणे आवश्यक झाले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
देशभरात कुठेही अतिरेक्यांना मदत करणार्या स्थानिक शक्तींना शोधून काढण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे. या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आज तीव्र निदर्शने करण्यात आली. निवेदनावर भाऊ महाराज, श्री.निफाडकर, योगीराज मराठे, भरत देवळे, गोवर्धन पटेल, अजय अग्रवाल, निलेश दिक्षीत राजेंद्र खंडेलवाल, रोहिणी पटेल, भारती बाविस्कर यांच्या सह्या आहेत.