अमरनाथ यात्रेवरील भ्याड हल्ल्याचा निषेध

0

जळगाव । येथील जिल्हा ‘जमीयते उलमा हिंद’तर्फे अमरनाथ येथील यात्रेदरम्यान ज्या बसवर दहशतवाद्यांनी केलेला निघृण हल्ल्यात सात भाविक मृत्यूमुखी पडले त्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.

सदर भ्याड हल्ल्याची केंद्रशासनाने सर्व बाजुने तपासणी करुन हल्लेखोरांवर व ज्यांच्या निष्काळजीपणाने त्यांना हल्ला करता आला त्यांच्यावर कडक कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.