मुंबई – श्री अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवूनही 10 जुलै 2017 या दिवशी अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवादी आक्रमण होऊन 7 जण ठार, तर 19 जण जखमी झाले. ही घटना गंभीर आणि चिंताजनक आहे. दोन वर्षांपूर्वीही आतंकवाद्यांनी आक्रमण करून लंगरची जाळपोळ केली होती आणि 24 जण घायाळ झाले होते. या सर्व कारवाया पाकिस्तानपुरस्कृत आहेत, हे आता स्पष्ट होत आहे. तरी अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करण्याचे धाडस पुन्हा कोणीही करणार नाही, असा धडा पाकिस्तानला आणि काश्मीरमधील आतंकवाद्यांना शिकवावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने केंद्र शासनाला करण्यात आले. अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारे हल्ले याच्या निषेधार्थ 15 जुलै 2017 ला काढण्यात आलेल्या निषेध मोर्च्यामध्ये हे आवाहन करण्यात आले. दादर (पश्चिम) येथील श्री हनुमान मंदिर येथून या मोर्च्याला प्रारंभ झाला. वीर कोतवाल उद्यान-शिवसेना भवनमार्गे शिवाजी पार्क असा मोर्च्या काढण्यात आला. या मोर्च्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, हिंदू गोवंश रक्षा समिती, शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळी, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, वज्रदल, विश्व हिंदू परिषद, शिवपुत्र प्रतिष्ठान, हिंदू राष्ट्र सेना, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, योग वेदांत समिती, सनातन संस्था या हिंदुत्वनिष्ठ संघटना यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी झाले होते.
बंगालचा बांगलादेश होण्याआधी ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !
एका विद्यार्थ्याने फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केल्याच्या कारणावरून गेले काही दिवस बंगालमध्ये जिहादी धर्मांधांनी धुमाकूळ घातला आहे. सहस्रो धर्मांधांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्याच्या बशीरहाट आणि बदुरिया भागात हिंदूंवर प्राणघातक आक्रमण करत हिंदूंची शेकडो घरे आणि मंदिरे उद्ध्वस्त केली, 35 हिंदू घायाळ झाले,हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले; इतके होऊनही बंगाल शासन धर्मांध मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळत सुस्त बसले आहे. त्यामुळे आता मोदी शासनाने बंगालचा बांगलादेश होण्याची वाट न पहाता, कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवणारे बंगाल सरकार विसर्जित करावे आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंचे रक्षण करावे.