अमरनाथ हल्ला: पालघरमध्ये कडकडीत बंद

0

जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली म्हणून आज पालघर बंदची हाक देण्यात आली आहे. याला नागरिकांनी प्रतिसाद दिला असून पालघरमध्ये कडकडीत बंद पाळल्याचे पाहायला मिळत आहे.

हिंदुंचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा अमरनाथचे दर्शन घेऊन परतणाऱ्या यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री हल्ला केला होता. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये डहाणूच्या उषा मोहनलाल सोनकर (६०) आणि निर्मला भरतसिंग ठाकूर (५३) या दोन महिला भाविकांचा देखील समावेश होता. त्यांच्यावर मंगळवारी शोकाकुल तावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी डहाणू बंद ठेवण्यात आले होते. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज पालघरमध्ये बंद ठेवण्यात आला आहे. या बंदला नागरिकांनी उत्सर्फुत प्रतिसाद दिला असून रस्ते, बाजारपेठा शांत दिसत आहेत.