अमरावतीतील दुर्गम भागात 50 घरे जळून खाक; 70 कुटुंबे बेघर

0

अमरावती । अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह या अतिशय दुर्गम भागात सोमवारी दुपारी अचानक आग लागली. यात सुमारे 50 घरे जळून खाक झाली आहेत. तर, 70 कुटुंबे बेघर झाली आहेत. मात्र कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

सीमाडोह हे गाव अतिदुर्गम भागातील गावाच्या मुलताई ढाणा परिसरात अचानक आग लागली. परंतु, हे गाव धारणी येथून 45 किमी, चिखलदरा येथून 35 किमी आणि अचलपूर येथून 45 किमी अंतरावर आहे. त्यामुळे अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यास बराच उशीर झाला. परिणामी, या आगीत मोठे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच महसूल व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, तातडीची सानुग्रह राशी दिली जात आहे. या आगीत जीवितहानी झाली नाही.

अचानक लागलेली आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले होते. यात जीवितहानी झालेली नसली. तरी या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. कपडे घरगुती वापराच्या वस्तू, अन्नधान्य संपूर्ण संसार उद्धवस्त झाला आहे. त्यामुळे बेघर झालेल्या 70 कुटुंबासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.