अमरावती: राज्यात सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदानाला गालबोट लागल्याचे प्रकार समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला आणि गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवली.
‘देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी साडेपाच वाजता गाडीतून खेचून मारहाण केली. त्यावेळी शहरातील काही लोक मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी गोळीबाराचा आवाज आल्यानंतर वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोरांनी पेट्रोल ओतून गाडी पेटवली.’
मोर्शीतून कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार यांच्यात थेट लढत आहे. भुयार हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असले, तरी त्यांना उभय पक्षांकडून किती मदत मिळते, यावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे.