अमरावती कृषि उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

0

अमरावती । अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणूकीत काँग्रेसचे प्रफुल राऊत हे बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी गटाच्या सात सदस्यांनी मतदान प्रक्रियेला उशीर लावल्याचा आरोप करत मतदानास नकार दिला. प्रफुल राऊत यांना 11 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. या निवडणुकीसाठी अमरावतीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस- शिवसेना युती बघायला मिळाली. मात्र या निवडणूक प्रक्रियेवर दबाव आणल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यावेळी केला.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती सुनील वर्‍हाडे यांच्यावर 18 पैकी 14 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर बाजार समितीचे कामकाज हे प्रभारी सभापतींमार्फत सुरू होते. निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेने युती करून भाजप व इतर पक्षांना पुन्हा एकदा सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले. भाजप व इतर 7 सदस्यांनी पीठासीन अधिकार्‍यांनी मतदान प्रक्रियेला उशीर लावल्याचे कारण सांगून मतदान करण्यास नकार दिला होता.