अमरावती वा राजधानी एक्स्प्रेसला महाराणा प्रतापांचे नाव देण्याची मागणी

0

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे खासदार रक्षा खडसेंना निवेदन

भुसावळ- अमरावती ते मुंबई वा राजधानी एक्स्प्रेसला महाराणा प्रताप यांचे नाव देण्याची मागणी गुरुवारी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे खासदार रक्षा खडसे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रसंगी डीआरएम आर.के.यादव यांनाही निवेदन देण्यात आले. नगरसेवक महेंद्रसिंग उर्फ पिंटू ठाकूर यांच्या नेतृत्वात समाजबांधवांनी निवेदन दिले.

राजपूत समाज हिताचा घ्यावा निर्णय
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रयत्नातून अमरावती-मुंबई एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती व या मार्गावर मोठ्या प्रमाणावर राजपूत समाजाचे वास्तव्य आहे. या गाडीला वा राजधानी एक्स्प्रेसला महाराणा प्रताप यांचे नाव दिल्यास समाज आपला ऋणी राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राजपूत समाजबांधवांच्या हिताचा निर्णय घेता सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर पत्रकार संजयसिंग चव्हाण, दामोदर राजपूत, संदीप पाटील, निलेश पाटील, नितीन पाटील, यशवंत चौधरी, खुशालसिंग पाटील, देविदास भोळे, रवींद्र पाटील, दारासिंग पाटील, दलजितसिंग चौधरी, रूपेश पाटील, सोनी ठाकूर, प्रदीपसिंग ठाकूर, हर्षल पाटील आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत तर निवेदन देताना नगरसेवक पिंटू ठाकूर, प्रमोद ठाकूर, संजय ठाकूर, प्रमोद ठाकूर, जगदीश ठाकूर, धनराज ठाकूर, प्रवीण ठाकूर, जितू ठाकूर, आबा ठाकूर, विक्की ठाकूर, किरण ठाकूर, संदीप ठाकूर, विनोद ठाकूर, दिलीप ठाकूर आदींची उपस्थिती होती.