धुळे । आमदार अमरीश पटेल यांच्या मालकीच्या सांताक्रुझ (प.) येथील 64 वर्षीय लेखापाल यांचा शुक्रवारी मीरा रोडजवळील रेल्वे मार्गावर मृतदेह आढळून आला. दरम्यान सीए कुट्टी हे अमरीश पटेल यांच्या डीसान कंपनीचे काम पाहत होते. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाने अमरीश पटेल यांच्यासह धुळे जिल्ह्यात त्यांचा कंपनीत भागीदार असलेल्या लोकांच्या निवासस्थानी चौकशी सुरू केली आहे. आणि आज सीए कुट्टी यांच्या अपघाती मृत्यू झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्कवीतर्क लढवले जात आहे.
सीए कुट्टी हे डीसान टेक्सफॅब या फॅब्रिक उत्पादकाच्या कार्यालयात होते. जेव्हा आयकर (आयटी) अधिकारी परिसर शोधत होते. ते सुमारे 3 वाजता बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, काही मिनिटांत परत येईल. मात्र त्याचा मृतदेह मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांदरम्यान सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.