धुळे: धुळे जिल्ह्यातील मातब्बर नेते माजी मंत्री आमदार अमरीश यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आज धुळ्यात प्रचारासाठी आले होते, त्यावेळी अमरीश पटेल यांनी भाजपात प्रवेश केला. अमरीश पटेल हे भाजपात जाणार अशी चर्चा होती, आज अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. अमरीश पटेल यांनी पक्ष सोडल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे, मात्र अद्यापही भाजपात इनकमिंग सुरु आहे.