अमळगाव सरपंचाविरूद्ध अविश्‍वास ठराव मंजूर

0

अमळनेर। तालुक्यातील अमळगाव येथील 10 ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील सरपंचाविरुद्द विविध कारणासाठी अविश्वास दाखल करण्यासाठी तहसीलदार यांना लेखी मागणी पत्र देवून अविश्वास मंजूर करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात ग्रामपंचायत सदस्य भारती पाटील, उज्वला मोरे, नलिनी कुंभार, प्रमिला भील, हर्षदा चौधरी, संगीता कोळी, संजय चौधरी, उमाकांत चौधरी, सुपडू भील, कृष्णराज पारधी यानी तहसीलदार प्रदीप पाटील यांना दिले आहे.

सरपंचपतींचा प्रत्येक कामास हस्तक्षेप नडला
अमळगाव ग्राम पंचायतच्या सरपंच कविता प्रविण चौधरी ह्या गावात कोणतेही विकास काम करीत नाहीत तसेच कामे करतांना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, सरपंच ग्राप कासर्याल्यात कधीच उपस्थित नसतात, गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत नाहीत, सरपंच पदाचे सह्या व सर्व कामे सरपंचपती प्रविण काशिनाथ चौधरी हे प्रत्येक कामात हस्तक्षेप करीत असल्यामुळे सदस्यांना ग्राम विकासाची कामे मोकळेपणाने करता येत नाहीत, सरपंच यांना भरपूर वेळा सांगुनही गावात स्वच्छता झाली नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून रोगराई व साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे.सरपंच हे दैनंदिन ग्राम पाणीपुरवठ्या बाबत उदासीन असून त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे,सरपंच ग्रापच्या मासिक सभेस अनुपस्थित राहत असून त्यांच्याजागेवर त्यांचे पती प्रतिनिधित्व करतात व् सदस्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन त्यांच्या मर्जिने सभेचे इतिवृत्त लिहिण्यास ग्रामसेवकास भाग पाडतात व् त्यावर सदस्यांना सह्या करण्यास धमकावतात, ग्रामपंचायतचा निधी अनावश्यक बाबींवर खर्च करतात,विविध निधी तसेच शासनाच्या विविध योजना तसेच वित्त आयोगाचा निधी कुठे खर्च झाला. याचे खर्च पत्रक हिशोब मासिक सभेत न मांडता परस्पर खर्चास मंजूरी मिळाल्याचे इतिवृत्त लिहून त्यावर सदस्यांना स्वाक्षर्‍या करण्यास भाग पडतात.