अमळनेरचा वैभव असलेला दगडी दरवाजा कोसळला !

0

पुरातन विभागाचा हलगर्जीपणा नडला

अमळनेर : शहराचे वैभव असलेला पुरातन दगडी दरवाजाचा एक भाग पावसामुळे कोसळला आहे. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. पावसात अजून बुरुज कोसळण्याची शक्यता असल्याने तहसीलदार ज्योती अहिरे यांनी कलम 144 अन्वये संचारबंदी लागू केली आहे.

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांनी नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केल्याने गर्दी कमी झाली. दगडी दरवाजा हा अमळनेर शहराचे वैभव मानला जातो. हा दरवाजा अत्यंत जुना असुन तो पुरातन विभागाच्या अखत्यारीत येतो. दरवाज्याला काही दिवसांपूर्वी एका गाडीने जोरदार धडक दिली होती. त्यामुळे त्या वेळी दरवाज्यास हानी पोहचली होती. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंकज चौधरी यांनी पुरातन विभागाला पत्र देऊन याबाबत माहिती दिली होती. मात्र तरी देखील पुरातन विभागाला जाग आली नाही, अखेर दगडी दरवाज्याची एक बाजू कोसळली.

दरम्यान घटनास्थळी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी नघटनास्थळी भेट दिली. गरपरिषदेने ढीग उचलण्याचे काम सुरु केले होते, मात्र पुरातत्व विभागाची परवानगी नसल्याने काम होऊ शकले नाही.