अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांना राष्ट्रीय पुरस्कार

0

अमळनेर । अमळनेर विधानसभा मतदार संघातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याने आमदार शिरीष चौधरी यांना ’महाराष्ट्र जर्नलिस्ट फाऊंडेशन’च्या वतीने ‘द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवार्ड 2017’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून आदर्श विधानसभा सदस्य म्हणून त्यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू प्रल्हादभाई मोदी यांच्या हस्ते 29 मे रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गोवा राज्यातील पणजी येथील दीनानाथ मंगेशकर कला संस्थेत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात गोवा राज्यांचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर , डॉ विकास आमटे, सिने अभिनेत्री पूजा सावंत, भाजपा ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, ओबीसी भाजपा प्रदेश सचिव सागर कहाणे, आदींसह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

’महाराष्ट्र जर्नलिस्ट फाऊंडेशन’च्या वतीने पत्र प्राप्त
विधानसभेला उमेदवारी करतांना अमळनेर तालुक्याती जनतेला दिलेल्या आश्‍वासनाची पुर्ततेकडे यशस्वीरित्या वाटचाल करत असल्यामुळे आमदार चौधरी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. संपर्णु देशातील आमदारांचा या समावेश आहे. ’महाराष्ट्र जर्नलिस्ट फाऊंडेशन’च्या वतीने ‘ देण्यात येणार्‍या पुरस्काराबाबत संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजीव लोहार यांचे पत्र नुकतेच आमदार शिरीष चौधरी यानां प्राप्त झाले आहे.

उत्तर महाराष्ट्रातून एकमेव
भारतातून एकूण 35, महाराष्ट्रातून दोन तर उत्तर महाराष्ट्रातुन एकमेव आमदार शिरीष चौधरी यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाऊंडेशन ही राष्ट्रीय उपक्रमशील संस्था असून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍यांना प्रोस्ताहीत करण्यासाठी सदरील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

अशी कामे केली
आमदार चौधरी यांनी अमळनेर विधानसभा निवडणुकीत जनतेला हाताला काम आणि शेताला पाणी यासह विविध आश्वासने दिली होती. त्यांनी शब्दानुसार अमळनेर येथे छत्रपती शिवराय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यांची उभारणी केली. स्वखर्चाने ग्रामीण भागात नाला खोली करण करून शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानास चालना दिल्याने तालुका जलमय झाला. रोजगारासाठी सूतगिरणी, शहरासाठी पाणी पुरवठा, डोहाची योजना आणली. आमदार चौधरी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.