अमळनेरच्या ऐश्‍वर्या देशमुख हिची स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

0

अमळनेर । न्यूव्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी ऐश्‍वर्या देशमुख या विद्यार्थींनीची स्केटिंग स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड करण्यात आली. शालेय तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेतील थालीफेकमध्ये 14 वर्ष वयोगटात योगिता देसले हिने तृतीय क्रमांक पटकवला. रिले स्पर्धेत ओम पाटील, जुमैद शेख, श्रेयश थोरात, दीपक पवार यांनी 14 वर्ष रिले गटात तृतीय क्रमांक मिळवला.

जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा चाळीसगाव तालुक्यातील बिलखेडा येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मैदानावर झाली. यात जिल्ह्यातील 22 शाळांचा सहभाग होता. तर 112 विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या स्पर्धा 11,14,17,19 या वयोगटातील विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी होत्या. यात क्वाड स्केटिंग इनलाइन स्केटिंग असे दोन प्रकार होते. या स्पर्धेत प्रत्येक वयोगट प्रकारानुसार तीन विद्यार्थी, विद्यार्थिनी विभागीय पातळीवर निवडले गेले. त्यात ऐश्‍वर्या देशमुख हिने तृतीय क्रमांक पटकवला आहे. विभागीय स्तरावरील स्पर्धा नंदुरबार येथील आंतररराष्ट्रीय दर्जाच्या नवीन मैदानावर ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात होणार आहेत. विजेत्यांचा गौरव करण्यात आला.