अमळनेर । येथील भांडारकर गल्लीतील रहिवाशी प्राचार्य डॉ. अजय मुरलीधर भामरे यांची मुंबई विद्यापिठाच्या वाणीज्य मॅनेजमेंट विभागाच्या मुख्य डिन पदी नियूक्ती झाली आहे. डॉ. अजय भामरे गेल्या 25 वर्षांपासून मुंबईच्या भांडूप परिसरातील रामानंद आर्या डी. ए. व्ही. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
अमळनेरचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचावले
त्यांचेतील शैक्षणीक कलागूणांमूळे ऊच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नवीन अध्रादेशानुसार मूंबई विद्यापिठाचे प्रभारी कुलगूरू डॉ दिनेश कांबळे यांनी दि 31 मे रोजी त्यांना वाणीज्य व विद्या व्यवस्थापन शाखेच मुख्य प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्तीचे पत्र दिले आहे. मुंबई विद्यापिठाला भविष्यकालीन शैक्षणिक घडामोडी व मार्गदर्शन करण्याचे प्रभारी कुलगूरू यांनी पत्रात नमूद केले आहे. शिक्षणाची पंढरी समजली जाणार्या अमळनेरच्या सुपूत्राची राज्यातील सर्वात मोठे समजल्या जाणार्या मुंबई विद्यापिठात अधिष्ठाता म्हणून नियुक्ती झाल्याने अमळनेरचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचावले आहे.
डॉ. अजय हे अमळनेर प्रताप कॉलेजचे विदयार्थी असून त्यांचे वडील एसटी डेपोत कंट्रोलर तर आई नपच्या मराठी शाळेत शिक्षिका होत्या. वडील बंधू राजेंद्र मुरलीधर भामरे पुण्यातील पिंपरी चिंचवड वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अमळनेर वाडी संस्थानचे हभप प्रसाद महाराज रांनी शुभाशीर्वाद तसेच अहिर सुवर्णकार समाज, डॉ राजेंद्र पिंगळे, अनिल अंबर पाटील, महेश कोठावदे, अनिल कदम, अॅड प्रदीप कुलकर्णी, माणिक पानसे, कैलास महाजन, विजय शुक्ल, जितेंद्र भामरे, रामदास निकुंभ, मुकूंद विसपूते, मोहन भामरे, निलेश देवपूरकर, आनंद दूसाने, मदन अहिरराव, राजेंद्र पोतदार आदींसह अहिर सुवर्णकार यूनियन तसेच सोनार सराफ असोसिएशनतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.