अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयास एन-मुक्टो सदस्यांची भेट

0

अमळनेर । येथील प्रताप महाविद्यालयाला अखिल भारतीय राष्टीय शैक्षिक महासंघ संलग्नीत एन-मुक्टो या संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय समिती सदस्यांनी भेट दिली. केंद्रीय कार्यकारीणी सदस्य व विद्यापीठ स्तयरीय सचिव प्रा.डाँ.अविनाश बडगुजर, जळगाव जिल्हा अध्यक्षा प्रा.डाँ.प्रज्ञा जंगले, अध्यक्ष प्रा.डाँ.पंकजकुमार नन्नवरे, प्रा. पवन पाटील, प्रा.भगवान भालेराव, प्रा.डाँ.दिलीप भावसार, प्रा.डाँ.धनंजय चौधरी, प्रा.डाँ.कुबेर कुमावत, प्रा.डाँ.मुकेश भोळे, प्रा.धिरज वैष्णव आदींची उपस्थिती होती.

नविन विद्यापीठ कायदा, उ.म.वि. प्राधिकरण निवडणूक, प्राध्यापकांच्या विविध समस्या, विद्यार्थी व प्राध्यापक गुणवत्ता वाढ इत्यादी विविध विषयांवर विचार विनीमय झाला. संघटनेने नविन पर्याय देवून जळगांव, धुळे, व नंदुरबार क्षेत्रात मेळावे घेऊन उत्तम प्रतिसाद मिळवून प्राध्यापकांच्या नविन संघटने विषयी उत्तम स्थान प्राप्त केले आहे. 13 आँगष्ट रविवार रोजी संघटनेच्या तीनही जिल्हा व उ.म.वि कार्यकारीणीची बैठक प्रताप महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला दिलीप रामू पाटील संबोधित करणार आहेत. उपस्थितीचे आव्हान केंद्रीय सदस्य व उ.म.वि स्तरीय अध्यक्ष प्रा.नितीन बारी यांनी केले आहे.