अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरणाला केंद्रिय जलआयोगाची मान्यता मिळाल्याने येथे आमदार शिरीष चौधरी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
आमदार चौधरी यांचे महाराणा प्रताप चौकात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे गटनेते प्रवीण पाठक, श्रीराम चौधरी, किरण गोसावी, सुंदरपट्टी येथील सरपंच सुरेश पाटील, जैतपीर येथील सरपंच नीलेश बागुल, रणछोड पाटील, दगडी सबगव्हाण येथील सरपंच नंदलाल पाटील, हिंगोणे येथील सरपंच सुनील सोनवणे, आर्डी येथील उपसरपंच किशोर पाटील आदी उपस्थित होते.
आमदार शिरीष चौधरी यांनी या धरणासाठी प्रयत्न करणारे माजी लोकप्रतिनिधी, पाडळसे धरण जन आंदोलन समिती आदींचा उल्लेख केला. या धरणामुळे तालुक्यातील जनतेचा लाभ होणार असल्याचे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.