अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर शहरात सोमवार रात्री दहा वाजेच्या सुमारास शिव पानसेंटर समोर दिनेश प्रकाश सोनार या तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घुन खून करण्यात आला होता.
याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. एक संशयित जखमी असून त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अन्य दोघे फरार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारीे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी शहरात भेट दिली. सायंकाळी पोलीस बंदोबस्तात मृत दिनेश सोनार याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
येथील सुभाष चौकात रात्री १० वाजेच्या सुमारास शिव पानसेंटर समोर दिनेश प्रकाश सोनार या तरुणाच्या आरोपींनी खुर्ची व दगड डोक्यात घालून हा खून केल्याची फिर्याद प्रकाश गुलाबराव सोनार यांनी पोलिसात दिल्यावरून विक्की जाधव, डॅनी उर्फ आकाश जेधे, सनी जाधव, कालू वस्ताद उर्फ राजेश बापाजी दाभाडे, बुद्धा उर्फ विकास जाधव, किशोर जाधव आदी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून बुद्धा उर्फ विकास जाधव गंभीर जखमी झाला असून त्याला धुळे येथील जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सनी जाधव, विक्की जाधव हे दोघी फरार असून डॅनी उर्फ आकाश जेधे, कालू वस्ताद उर्फ राजेश बापाजी दाभाडे, किशोर जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
घटनेत आरोपी बुद्धा उर्फ विकास जाधव याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. दोन गटातील पूर्ववैमनस्य वादातून हा प्रकार झाल्याचे समजते. मृत दिनेशचे शवविच्छेदन धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले. व्हिसेरा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मृतदेह आणल्यानंतर डिवायएसपी रमेश पवार, पोलीस निरीक्षक विकास वाघ, एपीआय उदयसिंह साळुंखे व दोन पोलीस पथक यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक जलिंदर सुपेकर, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे दिवसभर अमळनेर शहरात ठाण मांडून होते. गावात खून झाल्याने दिवसभर तणाव सदृश्य वातावरण होते.
अमळनेर शहरात नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनय कुमार चौबे आल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, सर्व गुन्हेगारांच्या याद्या अद्यायावद करण्याच्या सुचना दिल्या असून उद्यापासून शहरातील सर्व व्यवसाय रात्री १० पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून कोणतेही दुकान सुरू असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.उद्यापासून कोबिंग व नाकाबंदी सुरू राहिल. हिस्ट्री सिटर गुन्हेगारावर कडक नजर राहिल.अमळनेर माझ्या रडावर असल्याने याची सर्व माहिती स्वत: घेत जाईल.अमळनेरमध्ये शस्त्र सापडणे व त्याचा वापर होणे हे योग्य नाही. यावेळी अप्पर पोलिसअधिक्षक नंदकुमार ठाकुर, डिवायएसपी सदाशिव वाघमारे, पोनि विकास वाघ, उपस्थित होते.