अमळनेरातील जलयुक्तच्या कामांसाठी निधी मंजूर

0

अमळनेर । जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तिसर्‍या टप्प्यासाठी अमळनेर विधानसभा मतदार संघात 14 कोटी 54 लाख 93 हजार निधी मंजूर झाला असून यात अमळनेर तालुक्यातील 16 व पारोळा तालुक्यातील 5 अश्या एकुण 21 गावांमध्ये 8274 हेक्टरवर हि कामे होणार असल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली. याअंतर्गत सिमेंट नाला बांध, साठवण बंधारे, नाला खोलीकरण, पाझर तलाव अशी एकूण 1237 कामे केली जाणार आहेत. जलयुक्त शिवार च्या पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात 41 व 16 गावांची निवड होऊन पुरेसा निधी मिळाल्याने अनेक गावांची कामे मार्गी लागली आता तिसर्‍या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील 206 गावांची निवड केली यात अमळनेर मतदार संघातील 21 गावांचा समावेश असल्याची माहिती आण शिरीष चौधरी यांनी दिली.

या गावांची झाली निवड
जलयुक्तच्या तिसर्‍या टप्प्यात अमळनेर तालुक्यातील देवगाव-देवळी, अंचलवाडी, पळासदळे, वासरे, नगाव, गडखांब, रामेश्‍वर, जवखेडा, कोंढावळ, वावडे, पाडसे, लोणसीम, बहादरवाडी, शहापूर, पिंपळी-पिळोदे, कुर्हे बु, तसेच मतदार संघातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर, दगडी संबगव्हांण, दळवेल, रत्नापिंप्री व खेडीढोक आदी गावांमध्ये हि कामे होणार आहेत

विविध विभागामार्फत होणार काम
कृषी विभागामार्फत कंपार्टमेंट बंडीग, सीसीटी, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध दुरुस्तीची कामे अशी एकूण 935 कामे केली जाणार आहेत. तसेच लघुसिंचन जि.प विभागामार्फत सिमेन्ट नाला बांध, साठवण बंधारे, दुरुस्ती, व पाझर तलाव,(24 कामे). भूजल सर्वेक्षणामार्फत रिचार्ज शाफ्ट, रिचार्ज ट्रेच(100 कामे). पंचायत समिती मार्फत विहीर पुनर्रभरणं (116 कामे). लघुसिंचन जलसंधारण विभाग मार्फत सिमेंट नाला बांध (6 कामे). व वनविभागामार्फत खोल-सलग समतर चर, सिमेंट नाला बांध, वन बंधारा व तलाव खोलीकरण (67 कामे) आदी कामे केली जाणार आहेत.