खोटा गुन्हा रद्दची मागणी ; तहसीलदारांना निवेदन
रावेर- अमळनेर येथील अॅड.दिनेश पाटील यांना झालेल्या मारहाणीचा रावेर तालुका वकील संघाच्या वतीने निषेध करण्यात आला व त्यांच्यावर दाखल झालेला खोटा विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांना करण्यात आली.
प्रश्न विचारण्याचा राग आल्याने खोटा गुन्हा
तहसीलदार विजयकुमार ढगे यांना दिलेल्या निवेदनाानुसार अॅड.दिनेश पाटील हे अमळनेर न्यायालयात खटल्यातील पुढील तपासणी करतांना त्यांना विचारलेल्या प्रश्नांचा राग येऊन फिर्यादी व त्याच्यासोबत असलेल्या पुरुषांनी न्यायालयाच्या आत अॅड.पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली.संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी पक्षकारांकडून वकीलांवर हल्ले होत असून यामुळे वकील बांधव सुरक्षित नाही. पक्षकारांची बाजू माडतांना वकीलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. पक्षकारांची न्याय बाजु न्यायालया समोर मांडणे वकीलांना दिवसागणिक कठीण होत आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर संरक्षण कायदा पारीत करावा, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर वकील संघ अध्यक्ष अॅड.सुभाष धुंदले, अॅड.एम.ए.खान, अॅड.एम.बी.चौधरी, अॅड.जयंत तिवारी, अॅड.योगेश गजरे, अॅड.व्ही.बी.कोंघे, अॅड.शीतल जोशी, अॅड.अमोलआर.कोघे, अॅड.जे.जी.पाटील, अॅड.एम.अ.एन.शेख, अॅड.सतीश एस.वाघोदे, अॅड.चंद्रजीत जी.पाटील, अॅड.संदीप एस.भंगाळे, अॅडएस.बी.सांगळे, अॅड.प्रमोद एल.विचवे, अॅड.मिलिंद पाटील, अॅड.किशोर पाटील, अॅड.आर.ए.पाटील, अॅड.विपीन एम.गडे, अॅड.डी.डी.ठाकूर, अॅड.प्रमोद एस.पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत.