अमळनेर । मागील वर्षी झालेल्या भांडणाची पोलिसात तक्रार दिली म्हणून राग आल्याच्या कारणावरून शहरातील पैलाड भागातील दोन युवकांनी एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना 16 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता पैलाड भागात घडली असून जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मागील वर्षी झालेल्या भांडणाची तक्रार पोलिसात दिली म्हणून राग आल्याने आरोपी महेश भागवत पाटील (रा. पैलाड) याने फिर्यादी राहुल रमेश पाटील याला 16 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता पैलाड भागातील दरवाज्याजवळ शिवीगाळ, दमदाटी करीत ओठांवर धारदार शस्त्राने वार केला तर दुसरा आरोपी सतीश उत्तम पाटील (रा.पैलाड) याने फिर्यादीचा डावा हाताचा अंगठ्यास चावा घेवून पिरगळुन गंभीर जखमी केला. राहुल पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.कॉ.प्रभाकर पाटील हे करीत आहेत.