अमळनेरात ऑनलाईन पिक विमा भरण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी

0

अमळनेर । तालुक्यातील शेतकर्‍यांना पिक विमा रक्कम भरण्यासाठी शासनाने 5 ऑगस्ट ही शेवटची मुदत असल्याने शुक्रवार 4 ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंत संगणक सर्व्हर बंद असल्यामुळे पिक विम्याची रक्कम भरता आली नाही. आज दिवस भर ग्रामीण भागातील शेतकरी अमळनेर शहरात फिरतांना दिसत आले तर काही शेतकरी बँकेत जावून त्यांना ऑनलाईन भरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ह्या वर्षी पाऊस कमी प्रमाणात असल्यामुळे तालुक्यातील सत्तर टक्के शेतकर्यांनी दुबार पेरणी केली आहे त्यातच पिक विम्यासाठी शेतकर्‍यांना अमळनेर शहरात भटकंती करावी लागते आहे राज्य शासनाने ऑनलाईन विम्याची रक्कम न भरता मुदत वाढ देवून बँकेत भरन्यासाठीचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली