अमळनेर। येथील ग्रामिण रुग्णालयात कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी 21 रोजी करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश ताडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.एम.पाटील यांच्या हस्ते उद्घाटनकरण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे आर.एस.शिंदे, आर.सी.बारेला, सुरेखा पवार, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कुष्ठरोग अधिकार्यांनी सेवा केंद्र आणि उपलब्ध सेवा बाबत माहिती दिली. दर सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहून आठवड्यातून एकदा मोफत सेवा दिली जाणार असल्याचे सांगितले.
डॉ.ताडे व डॉ.जी.एम.पाटील यांनी रुग्णालयात इतर उपलब्ध सेवांबाबत माहिती देऊन हे रुग्णालय आता परिपूर्ण होत असल्याचे सांगितले, केंद्रात कुष्ठरोग निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन,रोगनिदानासाठी आवश्यक असल्यास त्वचा विलेपणाची सोय, कुष्ठरोग संबंधित, रोगप्रतिक्रीया व गुंतागुंतीचे व्यवस्थापन, कुष्ठरोगातील विकृतीचे प्रतिबंधन, भौतिकोपचार व मार्गदर्शन, कुष्ठरोगाबद्दल माहिती, सल्ला व समुपदेशन, कुष्ठरोग भौतिकोपचार व साधन सुविधा उपलब्ध करणे, इलेक्ट्रिकल मसल स्ट्रीमुलेशन, वॅक्स बाथ, स्प्लिन्ट, एम.सी.आर. चप्पल इत्यादी फिजिओथेरपी, हायड्रोथेरॅपी तसेच कुष्ठबाधितांना पुनर्वसनासाठी मार्गदर्शन आदी सेवा देण्यात येणार आहे.