अमळनेरात गॅसच्या भडक्यात संपुर्ण कार जळून खाक

 

 

 

अमळनेर

येथील बस स्टँड जवळ खासगी चारचाकी कारमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरत असतांना अचानक लागलेल्या आगीत चारचाकी वाहन संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना शहरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक वाहने ही बेकायदेशीर घरगुती गॅस वाहनात भरत असतात.अश्याच प्रकारे एका कारमध्ये गॅस भरत असताना अचानक आग लागल्याने पाहता पाहता कार जाळून खाक झाल्याची घटना आज अमळनेरात बस स्थानक परिसरात घडली. सुदैवाने कुठलाही अनर्थ घडला नाही.
शहरातील बसस्थानक परिसरात कार दुरुस्तीची गॅरेज असून याठिकाणी वाहनांमध्ये गॅस किट भरून त्यात गॅस भरत असतांना कारला दुपारी अचानक आग लागली . या आगीत गाडी जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत पोलिसांत आगीची नोंद करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

शहरातील काही रहिवासी वस्त्यांमध्ये बेकायदेशीर रित्या वाहनांमध्ये गॅस भरण्याचा धंदा राजरोसपणे सुरू असून भविष्यात काही जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे