अमळनेरात घरफोडीत 30 हजाराचा ऐवज लंपास

0

अमळनेर । येथील ढेकू रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील भरवस्तीत असणार्‍या एका बंद घर फोडीत चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून सुमारे 30 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. ढेकु रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ राहणारे चिंतामण गजानन भावे (वय 60) व त्यांची पत्नी एक महिन्यासाठी मुलाकडे पुणे येथे गेले होते. ते आज सकाळी परत आले असता त्यांना आपल्या घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी आत जावून पाहिले असता 15 हजाराचा एलजी कंपनीचा एलईडी टीव्ही, 15 हजार रुपये रोख व 500 रुपयांचे प्रशस्तीपत्रक चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. चिंतामण भावे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्थानकात भादंवि कलम 380 व 457 अन्वये अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत गोसावी हे करीत आहेत.