अमळनेर । येथील राणी लक्ष्मीबाई चौकात ए.पी.ज्वेलर्स दुकानाचे रात्रीच्या सुमारास शटर उचकवून अज्ञात चोरट्याकडून चोरी घडल्याची घटना घडली असून त्यात किती रकमेच्या दागिन्यांची चोरी झाली हे अद्याप समजू शकले नाही. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकात असलेल्या अतुल प्रविण सोनी यांच्या मालकीच्या ए.पी.ज्वेलर्स या दुकानाचे 28 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत अमळनेर पोलिसाना माहिती मिळाल्यानंतर जळगाव येथील गुन्हा अन्वेषन शाखेचे पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपासाचे काम सुरू केले. पोलिसांनी ठसे व इतर नमुने घेतल्यानंतर श्वान पथक मागविण्यात आले. परंतु श्वान फक्त दुकानातच घुटमळले त्याला चोरट्यांचा कोणताही माग सापडला नाही उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून गुन्हा दाखल झाल्यावरच किती रकमेच्या दागिन्यांची चोरी झाली यांची आकडेवारी समजणार आहे.