पोलिसांच्या कारवाईने अवैध धंदे चालकांमध्ये घबराट ; संशयीत अविनाश कंजर जाळ्यात
अमळनेर (प्रतिनिधी)- शहरातील टाकरखेडा रस्त्यावरील अशोक कंजर यांच्या घरात गांजा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे चार किलो गांज्यासह सुमारे २० लीटर देशी दारू जप्त करण्यात आली तर संशयीत आरोपी अविनाश कंजर यास अटक करण्यात आली.
या छाप्यात ४२ हजार ८६० रुपये किमतीचे ४. २८६ किलो गांजा व ५ हजार ८८ रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच दीड वाजता चोपडा रोड येथील सुरेश कंजर यांच्या घरी छापा टाकून १ हजार ५६० रुपये किमतीचा प्रो गुन्ह्याची मालमत्ता जप्त करून कारवाई केली.
पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पथकाने मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईने अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. कारवाई करणार्या पथकात प्रमोद बागडे, रवी पाटील, योगेश महाजन, संतोष पाटील, महिला पोलीस कर्मचार्यांचा समावेश होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चार महिन्यात दुसर्यांदा कारवाई
या पूर्वीही २१ फेब्रुवारी रोजी चाळीसगांव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक रफिक शेख यांच्या पथकांने ११ लाख रुपये किंमतीचा २०० किलो गांजा व १२५ लीटर ताडी संशयीत आरोपीच्या घरातून जप्त केला होता.