अमळनेर । येथील पारोळा रोड भागात दोन गटात झालेल्या हाणामारीत चार युवकांनी एकावर कुर्हाडीने वार केल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पारोळा रोड भागातील रहिवासी असणार्या दोन गटात सकाळी 9 वाजेच्या सुमारास समाधान शिंदे व अनिल पारधी यांच्यात वाद झाला. भांडणात समाधान शिंदे याने त्याच्यासोबत चार युवक आणून अनिल प्रकाश पारधी (30) यांच्यावर कुर्हाडीने वार केले. त्यात अनिल पारधी याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.