अमळनेर । शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन गाड्या चोरीचे प्रकार आज सकाळी उघडकीस आले. सिंधी कॉलनीतील बठेजा परिवाराला सकाळी 5 वाजेला लक्षात येताच त्यांनी वेळीच जागरूकता दाखवून टाकरखेडा 2 व्यक्तींना, चोपडा रोडवर 2 व्यक्तींना व धुळे रोड वर 2 व्यक्तींना पाठविले असता धुळे रोड वर डांगर गावाजवळ सकाळी 5:30 दरम्यान मोहसीन शहा सलीम शहा (वय 28, रा. धुळे) नामक व्यक्ती ही गाडी पळवून घेऊन जातांना त्यांनी पकडले.
अधिक चौकशीसाठी कोठडी
दरम्यान पकडलेल्या व्यक्तीसोबत असलेले दोन चोर मात्र पसार झालेत. मोहसीन शाह यास पकडून अमळनेर पोलिसांचे ताब्यात दिले असता त्याचेवर भाग 5 गुरनं 157/2017 भादवि कलम 379 प्रमाणे गाडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यास आज प्रथम वर्ग न्यायधिश अतुल कुलकर्णी यांच्या समोर उभे केले असता मोहसीन यास अधिक चौकशीकामी पुनश्च पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील करीत आहे. याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी रवींद्र बठेजा यांची शहरातून सिंधी कॉलनी भागातून हिरो होंडा फॅशन कंपनीची गाडी क्र (एमएच 19 एवाय 3769) व जयसिंग परदेशी यांची समर्थ नगरातून बजाज डिस्कव्हर क्र (एमएच 19 बीएल 1251) या दोन्ही 40 रुपये किमतीच्या गाड्या बुधवार 2 ऑगस्ट 2017 च्या रात्रीतून 3 ऑगस्ट 2017 च्या सकाळ दरम्यान चोरीस गेल्याच्या फिर्यादी अमळनेर पोलिसात नोंदविण्यात आल्या होत्या. पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी पकडून देणार्यांचे कौतुक केले.