अमळनेरात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

0

अमळनेर : येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात शुभेच्छा संदेश प्रणालीचे उद्घाटन सोबत नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम नुकताच पार पडला. श्री. मंगळदेव ग्रह मंदिरात अनेक भाविकांच्या जन्मदिनाची व लग्नाच्या वाढदिवसाची नोंद ठेवली जाते. या सर्वांना आता नियमितपणे वाढदिवस व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मंदिरातर्फे शुभेच्छा संदेश पाठविले जातील. यासाठीच्या स्वयंचलित प्रणालीचे उदघाटन संतश्री प्रसाद महाराज यांनी केले. आपल्या हातून भरीव विकास कार्य होवो या मंगलमय शुभेच्छा मंदिरातर्फेचा हा संदेश महाराजांनी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना यावेळी पाठविला.

नगरसेवकांनी केली मंगळ ग्रहाची महाआरती
काल या वर्षाचा शेवटचा मार्गशिर्ष मंगळवार होता. त्यानिमित्ताने नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील यांच्यासह नगरसेवकांनी मंदिरात महाआरती केली. मंदिरातर्फे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी.बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, दिलीप बहिरम, सेवेकरी जे.डी.कोठावदे, श्रीमती यु.एम.शाह, जयश्री साबे, सुनीता कुलकर्णी यांनी सर्वांचा सत्कार केला. नगरसेवक मनोज पाटील यांनी सर्वांतर्फे सत्काराला उत्तर देतांना नागरिकांच्या अपेक्षापूर्तीचे अभिवचन दिले. मंदिरात दर्शनास आलेल्या काँग्रेसच्या जेष्ठनेत्या अ‍ॅड.ललिताताई पाटील, जि.प.सदस्या मीनाताई पाटील, योजनाताई पाटील, येवले आप्पा, अनिलदादा जोशी, मनोज देवकर यांच्यासह अनेक भाविक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डिगंबर महाले यांनी केले.