अमळनेर । येथील कायम स्वरूपी अवर्षण व प्रणव क्षेत्र असलेल्या अमळनेर विधान सभा मतदारसंघातील टंचाई सदृश्य परीस्थितिवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्या संदर्भात नासिक विभागाचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देण्यात आले. सदरच्या निवेदनावर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जिल्हा बैंक संचालक अनिल पाटील, कोंग्रेस प्रदेश सरचिटणीस अॅड. ललिता पाटील, कॉग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, जि.प.सदस्या मीना पाटील, रॉ.का. तालुकाध्यक्ष विक्रांत पाटील, पं.स. सदस्या ललिता बैसाने, नगांव सरपंच ईश्वर कोळी आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील यांच्या सहया आहेत.
निवेदनात विविध मागण्या याप्रमाणे
अमळनेर विधानसभा मतदार संघातील 197 गावांची अंतिम पैसेवारी 50 पैसापेक्षा कमी असल्याने शासनाने 2015 व 2016 मध्ये विविध उपाय योजनासह टंचाई सदृश्य परिस्थिति जाहिर केलेली होती. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2016 मध्येही अमळनेर विधानसभा मतदार संघातील 10 मंडळा पैक्की नगांव पातोंडा भरवस वावडे आणि शेवाळे ता. पारोळा या 5 मंडळातील 111 गावामधील संपूर्ण वार्षिक सरासरीच्या 75 टक्के कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे त्याचे अवलोकन होवून टंचाई सदृश्य परिस्थिती जाहिर करावी व त्यावर उपाय योजना कराव्यात त्यात निम्न तापी प्रकल्प पाडळसे हा दोन वर्षापासून बंद असलेल्या प्रकल्पाच्या कामास गती येण्यासाठी मार्च 2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरीव निधीची तरतूद करावी. नगांव पतोंडा भरवस वावडे व शेवाळे या मंडळनिहाय 111 गावात वार्षिक सरासरीच्या 75 टक्कीपेक्षा कमी पर्जन्यमान झालेल्या भागात गावनिहाय शेततळे नाला खोलिकरण व विहीर पुनर्भरण या कामांना प्राधान्य देण्यात यावे.
जुन्या सिंचन प्रकल्पाची दुरुस्ती नुतनिकरण व पुनर्स्थापना अश्या प्रलंबित प्रस्तावांना चालना देणे, बोरी नदीवरील शिरसोद महाळपुर भिलाली कोळपिप्री आणि खळेश्वर बंधार्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करुन येत्या जून 2017 च्या पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यात यावी, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण बांधकाम विभाग जळगाव कंडील 51 गावांची पाणीपुरवठा योजना अमळनेर तापी नदीस आलेल्या महापुरामुळे उद्भावाचे मोठे नुकसान झाले असल्याने बंद आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतर्गत नगांव व 12 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी पिण्याच्या पाण्याकरिता पाणी आरक्षण 0.441 दलघमी पाणी आरक्षणास शासनाने 21 नोव्हेंबर 2015 रोजी मान्यता दिल्यानुसार नगांव व 12 गावे आणि बहादरपुर शिरसोदे महाळपुर ता. पारोळा येथील सामुदायिक पाणीपुरवठा योजना प्रलंबित प्रस्तावांना मान्यता द्यावी.बरणाईचे (लोटा बाडगी) सबगव्हाण, एकरूखी, पिंपळे बु॥, तळवाडे, ता.अमळनेर आणि दळवेल, काटसर व इंधवे, ता.पारोळा येथील प्रलंबित पाझर तलावाच्या कामाना गती द्यावी, जलयुक्त शिवार अभियानातर्गत समाविष्ट गावा मधील आराखड्या नुसार जिल्हा परिषद /पंचायत समिती निवडणूक आचार संहिता लागू होण्यापूर्वी मंजूर कामाना कार्यारंभ आदेश देवून कामे सुरु करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.