अमळनेरात पोहचले अक्कलपाडा धरणातील आवर्तनाचे पाणी

0

अमळनेर । धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातूंन पांझरा नदीत नुकतेच 300 क्यूसेस आवर्तन सोडण्यात आल्यानंतर हे पाणी अमळनेर हद्दीत पोहोचले असून तालुक्यातील मांडळ येथे ग्रामस्थांनी आनंदात जलपूजन केले. या आवर्तनामुळे अमळनेर तालुक्यात पांझरा नदीकाठावरील अनेक गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न तूर्तास सुटणार आहे. आमदार शिरीष चौधरी यांच्या विशेष प्रयत्नातून अक्कलपाडा धरणातून सुमारे 15 दिवसांपूर्वी पांझरा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. ते मुडी बोदर्डे गावा पर्यंत पोहचले आहे. पांझरा नदी धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातून वाहत असल्याने धुळे अमळनेर सिंदखेडा या तीन तालुक्यातील गावाना पिण्यासाठी तसेच शेती साठी फायदा होणार आहे.

आवर्तनामुळे या गावांना होणार फायदा
यामुळे पाणी पातळी वाढण्यात मदत होणार आहे. न्याहडोद, कवठल, वालखेडा, जापी, शिरडाने, कंचनपुर, मांडळ, वावडे, मुडी बोदर्डे, लोण बू, लोण खु, लोण चारम, भरवस, बाम्हणे, बेटावद , भिलालि, शाहापूर, तादळी आदि गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. हे आवर्तन सोडल्यास प्रशासनास भाग पाडल्याने आमदार शिरीष चौधरी यांचे परीसतील सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.