अमळनेर : शहरातील गायत्री नगरातील बंद घरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत 84 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घराला केले टार्गेट
जय योगेश्वर हायस्कूल जवळील गायत्री नगरातील रहिवासी सुचेता अरुणराव साळुंखे यांच्या घरात बुधवार, 9 दुपारी ते गुरुवार, 10 च्या सकाळी 11 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी 84 हजार 700 रुपये किमतींचे सोन्या-चांदीच्या देवांच्या मुर्त्या तसेच मंगळसूत्र चोरून नेले. यासंदर्भात अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार शरीफ पठाण करीत आहेत.