अमळनेरात बस कर्मचार्‍यांचा ‘चक्का जाम’

0

अमळनेर । येथील अमळनेर आगारातील वाहतूक नियंत्रक यांना चौकशीसाठी आलेल्या दोन युवकांनी कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना 16 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून बस कर्मचार्‍यांनी घटनेचा निषेध म्हणून सुमारे सव्वा तास चक्का जाम करून आंदोलन केले. तालुक्यातील पातोंडामार्गे चोपडा शहराकडील बसेस नेहमी येत असतात 16 जानेवारी रोजी सकाळी चोपडा नाशिक बस पातोंडा येथे चालकाने थांबविली नाही, म्हणून रोज ये-जा करीत असलेल्या विद्यार्थी यांनी संबंधित चालक व वाहकांविरूद्ध तोंडी तक्रार करण्यासाठी अमळनेर आगारात आले. परंतु विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याने जास्तच गोंधळ वाढला त्याच विद्यार्थ्यामधील एका विद्यार्थ्याचा मामा शहरात राहत असल्याने तोही त्याठिकाणी पोहचला, परंतु त्याने कोणतीही खातर जमा न करता वाहतूक नियंत्रक ब्रिजलाल बळीराम पाटील यांना कार्यालयात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचे पडसाद उमटले आणि एस टी कर्मचार्‍यांनी जागेवरच ’बसेस जैसे थे थांबवत चक्का जाम’ केला आगारात येणार्‍या बसेस रस्त्यावरच उभ्या राहून वाहतूक जाम झाली प्रवाशी खोळंबले काहींनी खाजगी वाहनाने जाणे पसंद केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेवून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान ब्रिजलाल पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून पैलाड येथील चेतन रमेश वाघ व संजय भगवान पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पोहेकॉ सुभाष साळुंके करीत आहेत.