अमळनेर । विविध मागण्यांसाठी शेतकर्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी अमळनेरात शनिवारी रस्त्यावर भाजीपाला, टमाटे, कांदा असा शेतमाल फेकून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आलया. यावेळी आंदोलनाचे नेते एस बी.पाटील, शिबाजी पाटील सचिन पाटील, प्रा. सुभाष पाटील, आदींनी मोदी व फडणवीस सरकारने शेतकर्यांची कशी फसवणूक केली आहे, याबाबत माहिती दिली. तब्बल अर्ध्या तास रास्ता रोको करण्यात आला त्यानंतर या संदर्भात प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. शनिवारी सकाळी शहरातील बळीराजा स्मारकाजवळ हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, 5 जून रोजी धिक्कार दिवस पाळला जाणार असल्याचे शेतकर्यांनी म्हटले आहे. दरम्यान, नगरपालिकेने तातडीने रस्त्यावरील भाजीपाला व कचरा साफ केला.
या आहेत मागण्या
शेतकर्यांच्या मालाला भाव मिळत नाही, हमी भावाचे गाजर दिले जात आहे. पाणी 20 रुपये लिटर आणि दुधाला 14 रुपये भाव आहे. म्हणून राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी तहसील कचेरीसमोर रस्ता रोको करून निषेध म्हणून दूध, कांदे, टमाटे, भाजीपाला रस्त्यावर फेकले त्यानंतर प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात सरसकट कर्जमाफी करत सातबारा कोरा करावा, शेतमालाला हमी भाव व व्यवस्थापन खर्च मिळावा, शेतीपंपासाठी मोफत वीज आदी मागण्रा करण्रात आल्रा.
शेतकरीविरोधी धोरणाचा धिक्कार
संप काळात 5 जूनला धिक्कार दिवस पाळला जाणार असून जळगाव येथे जिल्हाधिकार्यांना शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचे धिक्कार करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे नेते एस बी पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, प्रा सुभाष पाटील, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुलोचना वाघ, गिरीश पाटील, यशोदीप पाटील, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, माजी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील,मुख्तार खाटीक, विकास सिसोदे, धनगर पाटील, बाजार समिती संचालक सुरेश पाटील, माजी पंचायत समिती सभापती संदीप पाटील, अशोक पाटील (गंगापुरी), प्रशांत भदाणे, सुनील शिंपी, उमेश सोनार, संदेश पाटील, राहुल पाटील, दर्पण वाघ,रोहीत पाटील आदी असंख्य कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर,एपीआय लक्ष्मण ढोबळे व त्यांच्या सहकार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.