अमळनेरात ‘भारतीय संविधान जागर कार्यशाळा’

0

अमळनेर । येथील शिक्षण विभाग पंचायत समिती, बार्टी पुणे व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’भारतीय संविधान जागर कार्यशाळा’ विजय नवल पाटील आर्मी स्कुल येथे उत्साहात पार पडली. भारतीय संविधान कार्यशाळेचे उद्घाटन तहसीलदार प्रदिप पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात राज्यघटनेचा आत्मा प्रास्ताविकात आहे,असे सांगत तहसीलदार यांनी प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून घेतले. कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्य पी.एन.कोळी होते. गटशिक्षणाधिकारी अशोक बिर्‍हाडे यांनी ’भारतीय संविधान सर्व व्यापी व लोकाभिमुख‘ असल्याचे सांगत विद्यार्थ्यांपर्यंत संविधानाचा जागर पोहचवावा!, असे आवाहन केले’. प्रमुख वक्ते म्हणून प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ.एल.ए. पाटील यांनी समारोपीय भाषणात संविधान हे जीवन जगण्याची आचारसंहिता आहे, असे सांगितले.

यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
यावेळी पारेराव व अजय भामरे यांनी संविधान पोवाडा सादर केला. शिक्षक डी.ए. सोनवणे यांनी पुस्तक भेट देऊन तहसीलदार प्रदिप पाटील यांचे स्वागत केले. सूत्रसंचलन उमेश काटे यांनी केले. केंद्र प्रमुख पाठक, शरद सोनवणे, मुख्याध्यापक रणजित शिंदे आदि उपस्थित होते. डॉ. विलास पाटील, व्ही.ए.पवार, विश्‍वास पाटील, समता दूत शिवानी वाघ, नितीन भोई आदिनी परिश्रम घेतले. यावेळी अमळनेर तालुका व शहरातून मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या. एस.एन.महाले, डी.डी. घोडेस्वार, व्हि.डी. पाटिल, शिवाजी पाटील, जी.पी.हडपे, टी.के.पावरा आदींनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले.