अमळनेरात ‘मंगळ मंदिराकडून ज्ञान मंदिराकडे’ अंतर्गत साहित्य वाटप

0

अमळनेर। मंगळ मंदिराकडून ज्ञान मंदिराकडे या अभियानाच्या माध्यमातून मंगळ देव ग्रह मंदिरातर्फे ’मंगळ मंदिरा कडून ज्ञान मंदिराकडे’ या उपक्रमनतर्गत विद्यार्थ्यांना सहा वह्या, दोन पेन, पॅड, पट्टी असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शहरातील सुमारे दिड हजार विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप होणार आहे. यावेळी शिक्षक अशोक सूर्यवंशी, प्रभुदास पाटील, राजेंद्र पाटील, शशिकांत कापडणीस, राहुल पाटील, मनोज पाटील, सुदर्शन पवार, प्रदीप पाटील, सुषमा सोनवणे, सीमा मोरे, शीतल चव्हाण उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रदीप पाटील, संस्थेचे अध्यक्ष अनिल अंबर पाटील, जिल्हा शिक्षक पतपेढीचे माजी चेअरमन आर.एच. बाविस्कर, मंदिराचे अध्यक्ष राजू महाले, उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिव एस.बी बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्थ अनिल अहिरराव, मुख्याध्यापक प्रकाश पाटील होते. यावेळी राजू महाले म्हणाले की, आम्ही धार्मिक कार्यासोबतच सामाजिक जाणिवेचे भान ठेवतो. गरीब, गरजू व शेतकर्‍यांच्या कल्याणार्थ अनेक उपक्रम राबवित आहोत. टाटा बिल्डिंग मटेरियलतर्फे घेण्यात आलेल्या पर्यावरण या विषयावर निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.