अमळनेर । मुस्लीम पर्सनल लॉ आणि तीन तलाक बिला मध्ये हस्तक्षेप न करण्यासाठी अमळनेर शहरात फैजाने चिस्थिया बहुउद्देशीय संस्था संचलीत सुन्नी दारुल कझा तर्फे महिलांनी व शाळकरी विद्यार्थिनींनी भर उन्हात हजारोच्या संख्येने मूक मोर्चा काढून अमळनेर प्रांताधिकार्यांसह पोलिसांना निवेदन देण्यात आले. लोकसभेत पारीत झालेल्या तीन तलाक विधेयकाला विरोध असून भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे आहे अल्पसंख्यांकाच्या हितासाठी ही बाब धोकेदायक आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार जगण्याचा अधिकार दिला असून मुस्लीम पर्सनल लॉ बिला मध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अमळनेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पासून मोर्चाला सुरवात करीत दगडी दरवाजा, बाले मियाँ चौक, बसस्थानक , महाराणा प्रताप चौक, मार्गाने प्रांतधिकारी कार्यालयात मोर्चा धडकला. मोर्चाचे आयोजन सुन्नी दारुल कझा यांनी केले होते.