अमळनेर : अमळनेर शहरातील मुस्लीम बांधवानी मोठ्या उत्साहात ईद साजरी केली. सकाळी 9.30 वाजता गांधलीपुरा येथील ईदगाह मैदानावर ईद उल फितर ची पारमपारीक पद्धतीने नमाज पठन करण्यात आली. या आधी शहरातील विविध मस्जिदमध्ये ही नमाज अदा करण्यात आली. मुस्लिम समुदायाचा सगळ्य़ात महत्वाचा सण म्हणून ईदकडे पाहिले जाते. पवित्र रमजान महिन्यानंतर ईद साजरी करण्यात येते. रात्री पासूनच मुस्लीम बांधव ईदच्या तयारीला लागले होते. सकाळी ईद चे ग़ुस्ल केल्यानंतर सकाळी फजर ची नमाज पठन करण्यात आली व या यानंतर सर्व मुस्लीम बांधव नवे कपडे घालून सामूहीक नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मैदानावर एकत्र आले. ईदगाहवर जाण्याअगोदर शहरातील अन्य मस्जिदमध्ये ही ईदची ची नमाज पढण्यात आली. मौलाना इरशाद यानी नमाज पठन केली.
यांनी खुतबा दिला आणि इस्लामच्या भलाईसाठी सुख, शांतीसाठी दुआ मागीतली. जगामध्ये सुख व शांती नांदावी यासाठी ही दुवा मागण्यात आली. दुवा झाल्यानंतर सगळ्या मुस्लीम बांधवांनी एक- दुसर्यांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. अनेक मुस्लीम बांधव ईदगाह नंतर कब्रस्थानमध्ये गेले व तेथे जाऊन आपल्या नातेवाईकांसाठीही दुवा मागितली. यानंतर एक दुसर्यांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
विविध मान्यवरांच्या मुस्लिम बांधवांना दिल्यात ईदच्या शुभेच्छा
रमजान ईद निमित्त इदगाह मैदान अमळनेर येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतांना आमदार शिरीषदादा चौधरी,माजी आमदार डॉ बी. एस. पाटील,प्रांताधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, अनिल भाईदास पाटील,ऍड ललिता पाटील, मनोज पाटील नगरसेवक, प्रवीण पाठक, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, सचिन बाळू पाटील तालुकाध्यक्ष रॉ.का.,सलीम शेख, श्रीराम चौधरी, संतोष लोहरे, आरिफ भाया, गुलाम नबी, नाविद शेख, अनिल महाजन, डीगंबर महाले, जितेंद्र ठाकूर, योगराज सदांनशीव, सुरेंद्र पाटील, भरत पवार, हिंदु – मुस्लिम भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी ईदगाह मैदानात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.