अमळनेर । येथील श्री स्वामी समर्थ मंदिरातर्फे पं.पु. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे भव्य राष्ट्रीय सस्तंग व कृषी मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन शुक्रवार 17 फेब्रुवारी रोजी धुळे रोड अमळनेर येथे करण्यात आले आहे. प.पु. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे अमळनेरशी जुने नाते आहे 1970पासून श्री स्वामी समर्थ महाराजांची माहिती देण्यासाठी शहरात येत आहेत. त्यावेळेस त्यांनी शहरात केंद्राची स्थापना करावी, असा आग्रह धरला होता. त्यावेळी दत्त हौसिंग सोसायटीच्या मोकळ्या जागेत केंद्रासाठीच्या जागेसाठी नगरपालिकेच्या एस.के.बडगुजर यांच्याकडे मागणी केल्यावर त्यांनी तत्काळ यास मंजूरी दिल्याने त्या ठिकाणी केंद्राची स्थापना करण्यात आली.
अमळनेर केंद्र उभारणीसाठी अनुताईचे मार्गदर्शन
केंद्राच्या उभारणीसाठी सर्व खर्च एस.के.बडगुजर यांनी दिला. पं.पू. मोरे दादा हे अमळनेर सेवा केंद्रात सतत 11 वर्ष मार्गदर्शनासाठी येत होते. परंतु मोरे दादा एप्रिल 1988 मध्ये ब्रह्मलीन झाल्याने पं.पु. गुरुमाऊली सतत अमळनेर केंद्रात येत आहेत. अमळनेर केंद्र उभारणीसाठी अनुताईचा ही सिंहाचा वाटा असल्याने केंद्राने त्यांच्या नावे अनुताई बगीच्याची निर्मिती केली आहे. त्यात जोगिंग ट्रक बालकांना खेळण्यासाठी व जेष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था केंद्राचे अध्यक्ष बिपिन बापू यानी स्वखर्चाने करुन दिली. 17 रोजी सकाळी 7.30 ते 9.00 दुर्गा सप्तशती ग्रंथवाचन 9 ते 10 सुप्रसिद्ध कीर्तनकार गणेश करंजकर यांचे कीर्तन 10 वाजता प.पु. मोरे यांचे हितगुज व् कृषी मार्गदर्शक प्रवचन असा असेल, तरी तालुक्यातील सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्राचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले आहे.