अमळनेरात रास्ता रोको; कळमसरे व दोंडाईचा घटनेचा तीव्र निषेध

0

महिला मंचच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन देवून

अमळनेर । अमळनेर महिला मंचच्या वतीने कळमसरे व दोंडाईचा येथील घटनेचा विरोधात मुकमोर्चा काढण्यात आला व प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. घटनेचा महिला मंचच्या वतीने निषेध करत प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले व कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. तालुक्यातील कळमसरे येथे जिल्हा परीषद शाळेतील शिक्षकाकडुन चिमुकल्या विद्यार्थीनींवर वेळोवेळी अश्‍लील चाळे व लज्जास्पद कृत्य करण्यात आले व त्याचप्रमाणे दोंडाईचा येथील नुतन हायस्कूल येथे शिकणार्‍या पाच वर्षीय चिमुरडीला चॉकलेटचे अमिष दाखवून लैंगिक शोषण करण्यात आले. या दोन्ही घटना सामाजिक जिवनाला बाधा आणणार्या व पुरोगामी महाराष्ट्राला तसेच पवित्र अश्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे. यामुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे समाजात असमतोल निर्माण होत आहे.

निवेदनात या आहे मागण्या
त्यामुळे अमळनेर महिला मंचच्या वतीने निषेध करीत अमळनेर प्रांताधिकारी गायकवाड यांना निवेदन देऊन या दोन्ही घटनेस जबाबदार नराधमांना कठोर शिक्षा व्हावी व पुन्हा शिक्षकी पेशात नियुक्ती करू नये मुली आणि महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने काटेकोर पाळावी अमळनेर शहरात डी आर कन्या शाळा, प्रताप महाविद्यालय, सानेगुरुजी, मंगलमूर्ती चौक, तसेच भागवत खाजगी क्लासेस परिसर याठिकाणी निर्भया पथक साध्या कपड्यातील पोलीस आदींची व्यवस्था करीत टारगट विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करावी, शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, भविष्यात अश्या घटना घडु नयेत यासाठी शासनाने व प्रशासनाने योग्य व कठोर उपाययोजना करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

मुकमोर्चात महिला मंचच्या सदस्यांसह महिलांना घेतला सहभाग
यावेळी डॉ.अपर्णा मुठे, तिलोत्तमा पाटील, जयश्री दाभाडे, योजना पाटील, प्रा.शिला पाटील, सुलोचना वाघ, माधुरी पाटील, रंजना देशमुख, अ‍ॅड.तिलोत्तमा पाटील, विजया जैन, नयना कुलकर्णी, भारती गाला, वसुंधरा लांडगे, सरोज भांडारकर, उज्वला शिरोडे, पुष्पाबाई भामरे, पुष्पाबाई राजपूत, सुरेखा पवार, राजश्री पाटील, प्रियंका पाटील, सुनिता पाटील, सुनंदा गुजराथी, संगीता भिल, वजाताई भिल, शितल सावंत, आशा चावरीया, विपुला नांढा, जासमीन भरुचा, कविता पवार, स्वाती एकतारे, रुपाली जोशी, विद्या हजारे, निशा दुसाने, करुणा सोनार, रेणुप्रसाद भारती पाटील, प्रतिभा कुलकर्णी, प्रगती काळे, योजना पाटील, अलका पवार, संगिता पाटील, गीतांजली पाटील, अलका पवार, अ‍ॅड. तिलोत्तमा पाटील, शितल पाटील, सिता चुडासामा,आदी उपस्थित होते. दहावीच्या विद्यार्थिनीं यावेळी या विषयावर अत्यंत कडक मनोगत व्यक्त केले. दहावीच्या विद्यार्थिनीं यावेळी या विषयावर अत्यंत कडक मनोगत व्यक्त केले. यावेळी पी.बी ए.इंग्लिश स्कूल, सरस्वती विद्या मंदीर, एस.एन.डी.टी.कॉलेज, रुख्मिनी कॉलेज,डी. आर. कन्या शाळा,या शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.